Matthew 1:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव मरीया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला. मरीयेचे योसेफशी लग्न ठरले होते. परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरिया हिचा योसेफबरोबर वाङ्‌निश्चय झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरीया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीयाचा िववाह योसेफाबरोबर ठरला होता. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला; त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.