Matthew 1:24 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदूताने जशी त्याला आज्ञा केली होती तसेच त्याने केले, त्याने मरीयेशी लग्र केले. 25पण तिने मुलाला जन्म देईपर्यत त्याने तिला जाणले नाही. आणि योसेफने त्याचे नाव येशू ठेवले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आदेश दिल्याप्रमाणे त्याच्या पत्नीचा स्वीकार केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे केले; त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योसेफाने जागा झाल्यावर, प्रभूच्या दूताने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले आणि मरीयेला त्याची पत्नी म्हणून घरी आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले, त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला.