Matthew 10:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्याला विश्र्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांविरूद्ध उठून त्यांना जिवे मारण्यास देतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
भाऊ भावाला व वडील मुलाला ठार मारण्यासाठी धरून देतील. मुले आईवडिलांवर उठून त्यांना ठार मारवतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, ‘मुले आईबापांवर उठून’ त्यांना ठार करतील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“भाऊ भावाला, पिता आपल्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्यास विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांवर उठून त्यांना जिवे मारण्यास देतील.