Matthew 10:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या बाराजणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले. यहूदीतर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या बारा जणांना पाठवताना येशूने आदेश दिला, “परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या बारा जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की, “परराष्ट्रीयांकडे जाणार्‍या वाटेने जाऊ नका व शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी बारा प्रेषितांना सूचना देऊन पाठविले: “गैरयहूदी लोकांकडे जाऊ नका किंवा शोमरोन्यांच्या कोणत्याही शहरात प्रवेश करू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने या बाराजणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की: परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.