Matthew 11:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि तु कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते शहर आतापर्यत टिकले असते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि हे कफर्णहूमा, तुला आकाशापर्यंत चढवले जाईल काय? तुला नरकात फेकले जाईल! तू जे चमत्कार पाहिले ते सिदोनात घडले असते, तर ते नगर आजपर्यंत राहिले असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत उंचावलेला होशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील;’ कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे कफर्णहूमा, तुला आकाशापर्यंत उंच केले जाईल काय? नाही, तू नरकात खोलवर जाशील, कारण जी अद्भुत कृत्ये मी तुझ्यात केली ती सदोममध्ये केली असती तर सदोम आजपर्यंत अस्तित्वात असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तू कफर्णहूम शहरा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते नगर आतापर्यंत टिकले असते.