Matthew 12:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रीति करतो, आणि त्याच्याविषयी मला संतोष वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो यहूदीतरांसाठी योग्य न्यायाची घोषणा करील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी मी प्रसन्न आहे, त्याच्यावर मी माझा आत्मा पाठवीन व तो परराष्ट्रीयांना माझा न्याय कळवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे; तो मला परमप्रिय आहे; त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पाहा, हा माझा सेवक, ज्याला मी निवडलेले आहे, जो मला प्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन. राष्ट्रांना तो न्याय जाहीर करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रीती करतो आणि त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो परराष्ट्रीय लोकांस योग्य न्यायाची घोषणा करील.