Matthew 15:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते देवाचे नियम मोडीत आहेत. आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अशा माणसाने आपल्या वडिलांचा अथवा आईचा सन्मान केला नाही तरी चालेल. अशा प्रकारे, तुम्ही आपली परंपरा चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशाप्रकारे ते त्यांच्या आईवडिलांचा मान ठेवीत नाहीत, पण तुमच्या परंपरा पाळल्या जाव्या म्हणून तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.