Matthew 17:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पेत्र येशूला म्हणाला, ʇप्रभु, येथे असणे हे आपणांसाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पेत्र म्हणाला, “गुरुवर्य, आपण येथे आहोत, हे किती चांगले आहे! आपली इच्छा असल्यास मी येथे तीन मंडप उभारतो - आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग पेत्र येशूला म्हणाला, “प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे तीन मंडप करतो; आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “प्रभूजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल. आपली इच्छा असेल, तर मी येथे तीन मंडप उभारेन एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, येथे असणे हे आपणासाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”