Matthew 18:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जगाचा धिक्कार असो कारण त्याच्यातील काही गोष्टींमुळे ते लोकांना पापात पाडते. तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या गोष्टींना कारणीभूत होतात. त्यांना फार अहिताचे ठरेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अडखळण होणे ही जगासाठी किती भयानक गोष्ट आहे! अशी अडखळणे अवश्य घडणार. परंतु ज्याच्याकडून ती अडखळणे घडतील त्याची केवढी दुर्दशा होणार!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अडखळणांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार! अडखळणे तर अवश्य होणार; परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याच्यामुळे लोकांना अडखळण येतात त्या जगाचा धिक्कार असो! अडखळण येणारच नाही हे अशक्य आहे, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याला धिक्कार असो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अडखळण्याच्या कारणामुळे जगाला धिक्कार असो! तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या अडखळण्याला कारणीभूत होतील त्यांना फार हानीचे ठरेल.