Matthew 18:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जर तुमचा डोळा तुम्हांला पापात पाडीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या. कारण एकच डोळा असला आणि तुम्हाला अनंतकालचे जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यांसह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुझा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळे असून नरकाग्नीत पडण्यापेक्षा एक डोळा असून जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा डोळा तुला अडखळवत असेल तर तो उपटून फेकून दे; दोन डोळे असून अग्निनरकात पडावे ह्यापेक्षा एक डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुझा डोळा तुला अडखळण करीत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळ्यांसह अग्नीच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने जीवनात जाणे उत्तम आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तुमचा डोळा तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या कारण एकच डोळा असला आणि तुम्हास सार्वकालिक जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यासह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे.