Matthew 19:29 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरिता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्याला त्यापेक्षा कितीतरी जास्तापटीने लाभ होईल व त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच ज्याने घरे, भाऊ, बहिणी, वडील, आई, पत्नी, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत, त्याला शंभरपटीने मिळून शाश्वत जीवन वतन म्हणून प्राप्त होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत त्याला शंभरपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या कोणी मला अनुसरण्यासाठी आपले घर, भाऊ बहीण, आई, पिता, पत्नी, मुले, मालमत्ता यांचा त्याग केला आहे, त्याला शंभरपट मोबदला तर मिळेलच, पण सार्वकालिक जीवनही मिळेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याने ज्याने माझ्यामागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल.