Matthew 2:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रामा येथे आकांत ऐकू आला. दु:खदायक रडण्याचा हा आकांत होता. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे, पण तिचे सांत्वन करणे अशक्य झाले कारण तिची मुले मरण पावली आहेत.” यिर्मया 31:15
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
राम्हा येथे रडणे व मोठा आकांत ऐकण्यात आला; राहेल आपल्या मुलांकरता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून काही केल्या तिचे सांत्वन होईना.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“रामा येथे रडणे व मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“रामाह मधून आवाज ऐकू येत आहे, आकांत आणि घोर शोक, राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे. ती सांत्वन पावण्यास नकार देते, कारण ते आता राहिले नाहीत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“रामा येथे रडणे व मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे, आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.”