Matthew 2:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दूत म्हणाला “ऊठ! बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा. जे लोक बाळाला मारू पाहत होते ते आता मेले आहेत.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“ऊठ, बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा कारण बाळाचा जीव घ्यायला जे टपले होते, ते मेले आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“ऊठ, बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलाच्या देशास जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि सांगितले, “ऊठ, बालक व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते, ते मरण पावले आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“उठ, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्राएल देशास जा, कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.”