Matthew 2:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योसेफ नासरेथ नावाच्या गावात गेला आणि तेथे राहिला. ख्रिस्त नासरेथकर म्हटला जाईल, असे जे देवाने संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणूल हे झाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘त्याला नासरेथकर म्हणतील’, हे जे ख्रिस्ताविषयी संदेष्ट्याद्वारे भाकीत करण्यात आले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून तेथे तो नासरेथ नावाच्या नगरात जाऊन राहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
व नासेरथ नावाच्या गावी जाऊन राहिला; अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि ते नासरेथ या गावात राहिले. संदेष्ट्यांनी केलेले भविष्य पूर्ण झाले ते असे: “त्यांना नासरेथकर म्हणतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.