Matthew 2:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“हे बेथलहेमा, यहूद्यांच्या भूमिप्रदेशा, तू यहूद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील, असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल.”‘ मीखा 5:2
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे बेथलेहेमा, यहुदाच्या प्रांता, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस, असे मुळीच नाही. माझ्या इस्राएली लोकांचे नेतृत्व करील असा सरदार तुझ्यातून उदयास येईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘हे यहूदाच्या प्रांता, बेथलेहेमा, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही; कारण माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘परंतु तू यहूदीया प्रांतातील बेथलेहेमा, यहूदीयांच्या शासकांमध्ये तू कोणत्याही प्रकारे कमी नाही, तुझ्यातून एक शासक उदय पावेल, तो माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ होईल.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’”