Matthew 2:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर त्याने त्यांना बेथलहेमला पाठविले. हेरोद त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा. आणि तुम्हांला ते सापडल्यावर मला सांगायला या. म्हणजे मी सुद्धा जाऊन त्याला नमन करू शकेन.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर त्याने त्यांना बेथलेहेमला पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बाळाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हांला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याची उपासना करीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा, व तुम्हांला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग हेरोदाने त्यांना बेथलेहेमात पाठविले आणि म्हणाला, “जा आणि त्या बालकाचा बारकाईने शोध करा; तो सापडल्यावर, इकडे परत या आणि मला सांगा, म्हणजे मी सुद्धा जाऊन त्यांची उपासना करेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व तुम्हास शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मी ही येऊन त्यास नमन करीन.”