Matthew 20:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते मनुष्याच्या पुत्राला यहूदीतरांच्या हाती देतील. ते लोक त्यची थट्टा करतील, त्याला चाबकाने मारतील नंतर ते त्याला वधस्तंभावर खिळून जिवे मारतील. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविले जाईल.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
निर्भर्त्सना करायला, फटके मारायला व क्रुसावर चढवायला ते त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील व तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि थट्टा करण्यास, फटके मारण्यास व वधस्तंभावर खिळण्यास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि तिसर्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते लोक त्याची थट्टा करतील, त्याला फटके मारतील व क्रूसावर खिळतील; परंतु तीन दिवसानंतर तो मरणातून पुन्हा उठेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्यास परराष्ट्रीयांच्या हाती देतील. परंतु तिसऱ्या दिवशी तो परत जीवनात येईल.”