Matthew 20:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने तिला विचारले, तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने तिला म्हटले, “तुला काय पाहिजे?” ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे स्थान मिळेल, असे जाहीर करा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने तिला म्हटले, “तुला काय पाहिजे?” ती त्याला म्हणाली, “तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “तुमच्या राज्यामध्ये माझा या दोन पुत्रातील एकाला आपल्या उजवीकडे व दुसर्‍याला डावीकडे बसू द्यावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”