Matthew 21:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी त्याला विचारले, ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, होय, पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे ते तुम्ही ऐकले नाही का? तू बालके व तान्हुली यांना स्तुती करायला शिकविले आहेस.’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि त्याला म्हणाले, “ही मुले काय बोलतात, हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “हो, “बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करविली आहेस’, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
व त्याला म्हणाले, “ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “होय; ‘बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करवली आहे’, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी येशूंना विचारले, “ही मुले काय म्हणत आहेत, हे तुम्ही ऐकत आहात ना?” येशूंनी उत्तर दिले, “हो, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? “ ‘लेकरे आणि तान्ही बालके यांच्याद्वारे हे प्रभू तू आपली स्तुती प्रकट केली आहे,’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी त्यास विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, “होय. परंतु तू बालके व तान्हुली यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे. हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?”