Matthew 21:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रस्त्याच्या कडेला त्याला अंजिराचे एक झाड दिसले. अंजिर खायला मिळेल या आशेने तो झाडाजळ गेला. पण झाडावर त्याला एकही अंजिर दिसले नाही. त्याला फक्त पाने होती. येशू त्या झाडाला म्हणाला, यापुढे तुला कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले आणि मेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून तो वाटेवर असलेल्या अंजिराच्या झाडाजवळ गेला. पण पानांशिवाय त्याला त्यावर काही दिसले नाही. त्याने त्या झाडाला म्हटले, “ह्यापुढे तुला कधी फळ न येवो.” ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्याजवळ गेला; पण पानांशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, “ह्यापुढे तुला कधीही फळ न येवो.” आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जवळच त्यांना अंजिराचे झाड दिसले. त्यावर काही अंजीर आहेत काय हे पाहण्यास ते झाडाजवळ गेले. त्या झाडावर त्यांना पानांशिवाय काही आढळले नाही. मग ते त्या झाडाला म्हणाले, “यापुढे तुला फलप्राप्ती होणार नाही.” आणि तत्काळ ते झाड वाळून गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रस्त्याच्या कडेला त्यास अंजिराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला. पण पानाशिवाय त्यास एकही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला, कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले.