Matthew 21:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला.?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू मंदिरात शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडीलजन त्याच्याजवळ येऊन विचारू लागले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर तो मंदिरात जाऊन शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडील जन त्याच्याजवळ येऊन म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता? तुम्हांला हा अधिकार कोणी दिला?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि ते शिकवीत असता मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले व त्यांना जाब त्यांना विचारू लागले, “कोणत्या अधिकाराने या गोष्टी तुम्ही करत आहात? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू परमेश्वराच्या भवनात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक लोक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हास कोणी दिला?”