Matthew 21:25 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही मला सांगा, योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे. तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला- देवाकडून की मनुष्यांकडून?” येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, ‘योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणले मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
योहानला बाप्तिस्मा देण्याचा अधिकार कोठून मिळाला? देवाकडून की माणसांकडून?” ते आपसात चर्चा करू लागले, “देवाकडून म्हणावे तर तो आपल्याला म्हणेल, “मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गापासून किंवा माणसांपासून?” तेव्हा ते आपसांत विचार करू लागले की, “‘स्वर्गापासून’ म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योहानाला बाप्तिस्मा करण्याचा अधिकार कुठून प्राप्त झाला होता, स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून?” या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली, “योहानाचा बाप्तिस्मा, ‘स्वर्गापासून होता,’ असे आपण म्हणालो, तर ते विचारतील, ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही’?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गाकडून की मनुष्यांकडून?’” येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’