Matthew 21:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्हांला काय वाटते ते सांगा बरे? एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मोठ्या मुलाकडे जाऊन म्हणाला, “मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्हांला काय वाटते ते सांगा बरे! एका मनुष्याला दोन मुलगे होते; तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, ‘मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुम्हाला काय वाटते? एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मोठ्या मुलाला म्हणाला, ‘मुला, आज द्राक्षमळ्यामध्ये जा व काम कर.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याविषयी तुम्हास काय वाटते ते मला सांगा; “एका मनुष्यास दोन पुत्र होते. तो आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’