Matthew 21:42 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू त्यांना म्हणाला, तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की. ‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे हे प्रभूने केले आणि आमच्यासाठी हे अदभुत आहे.’ स्तोत्र 118:22-23
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू त्यांना म्हणाला, “‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे!’, असे धर्मशास्त्रात तुम्ही कधी वाचले नाही काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू त्यांना म्हणाला, ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला; हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे’, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी त्यांना म्हटले, “धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय: “ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला आहे; प्रभूने हे केले आहे, आणि आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्रलेखात कधी वाचले नाही काय? ‘बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला आहे. हे प्रभूने केले आणि आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’