Matthew 21:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही लोक येशूच्या पुढे चालू लागले. काही लोक येशूच्या मागून चालू लागले. ते लोक मोठ्याने जयघोष करु लागले, “होसान्ना, दाविदाच्या पुत्राला प्रभुच्या नावाने येणारा धन्यवादित असो, स्वर्गीय देवाला होसान्ना!” स्रोत 118:26
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! दावीदपुत्राचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! ऊर्ध्वलोकी होसान्ना!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की, ‘दाविदाच्या पुत्राला होसान्ना!’ ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित!’ ‘ऊर्ध्वलोकी होसान्ना!’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग जमावातील जे लोक त्यांच्यापुढे गेलेले आणि जे त्यांच्यामागून चालले, ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.” “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!”