Matthew 22:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते म्हणाले, गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मेला आणि त्याला मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने किंवा जवळच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मेलेल्या भावासाठी त्यांना मुले होतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“गुरुजी, मोशेने सांगितले आहे की, जर एखादा मनुष्य मूलबाळ नसता निधन पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेबरोबर विवाह करून त्याच्या भावाचा वंश चालवावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“गुरूजी, मोशेने सांगितले आहे की, ‘जर एखादा मनुष्य संतान नसता मेला तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“गुरुजी, मोशेने आम्हाला सांगितले आहे की, एखादा मनुष्य, मूल न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी लग्न करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते म्हणाले, “गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मरण पावला आणि त्यास मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मरण पावलेल्या भावाचा वंश चालेल.