Matthew 23:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा. पण ते जसे करतात तसे करू नका. मी असे म्हणतो याचे कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे करत नाहीत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतात, ते सर्व पाळा व करा, परंतु ते वागतात तसे तुम्ही वागू नका, कारण ते सांगतात तसे ते स्वतः करत नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतील ते सर्व आचरत व पाळत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका; कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या सांगण्याप्रमाणे करा, पण ते जसे करतात तसे आचरण करू नका, कारण ते सांगतात त्याप्रमाणे करीत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा आणि पाळा. पण तुम्ही त्यांच्या कृतीप्रमाणे तसे करू नका. याचे कारण ते सांगतात पण त्याप्रमाणे करत नाहीत.