Matthew 23:30 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर त्यांना या संदेष्ट्यांना जिवे मारण्यास मदत केली नसती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि दावा करता, “आम्ही आमच्या पूर्वजांच्या काळात असतो, तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि म्हणता, ‘आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही म्हणता, ‘आम्ही आमच्या वाडवडीलांच्या काळात राहत असतो, तर संदेष्ट्यांचे रक्त सांडण्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर कधीही भाग घेतला नसता.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर संदेष्ट्यांच्या रक्तात त्यांचे भागीदार झालो नसतो.