Matthew 23:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते त्यांचे सर्व चांगले काम लोकांनी पाहावे म्हणून करतात. ते पवित्र शास्त्र लिहिलेल्या लहान पेट्या मोठमोठ्या बनवितात आणि लोकांनी पाहावे म्हणून लांब झगे घालतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते त्यांची सर्व कामे लोकांना दिसावीत म्हणून करतात. ते त्यांचे मंत्रपट्टे व त्यांच्या वस्त्रांच्या किनारी रुंद करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जे काही करतात ते सर्व लोकांना दाखविण्यासाठी असते: ते वचने लिहिलेल्या चामड्याच्या पट्ट्या लोकांना दिसाव्या म्हणून रुंद करतात आणि आपल्या झग्यांचे गोंडे लांब करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते त्यांचे सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून करतात कारण ते आपली स्मरणपत्रे रूंद करतात आणि आपल्या झग्यांचे काठ मोठे करतात.