Matthew 24:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दानिएल संदेष्ट्याद्वारे नमूद केलेले ओसाड अमंगल दुश्चिन्ह पवित्र स्थानात तुम्ही पाहाल. (वाचकाने ह्याचा अर्थ समजून घ्यावा.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दानिएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे),
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“संदेष्टा दानीएलाने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ पवित्रस्थानी उभा असलेला तुम्ही पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.)