Matthew 24:29 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“छळानंतर लगेच, असे घडेल: ‘सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही. आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील आकाशातील सर्व शक्ती डळमळतील. आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल. यशया 13:10; 34:4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या दिवसांतील संकटांनंतर लगेच सूर्य अंधकारमय होईल. चंद्र आपला प्रकाश देणार नाही. आकाशातून तारे गळून पडतील; आकाशातल्या शक्ती डळमळतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“क्लेशांच्या काळाची समाप्ती झाल्यावर “ ‘त्या दिवसात, सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही; आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.