Matthew 24:31 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मनुष्याचा पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्तीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कर्ण्याच्या नादाबरोबर तो त्याच्या दूतांना चोहीकडे पाठवील व ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘कर्ण्याच्या महानादाबरोबर’ तो आपल्या दूतांना पाठवील, आणि ‘ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्या सीमेपर्यंत’ त्याच्या निवडलेल्यांना ‘चार्ही दिशांकडून जमा करतील.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो कर्ण्यांच्या महानादाबरोबर आकाशांच्या या टोकापासून दुसर्या टोकापर्यंत आणि चारही दिशेकडून त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी आपल्या दूतांस पाठवेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनुष्याचा पुत्र कर्ण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.