Matthew 24:39 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांना माहीत नव्हते की काही तरी घडणार आहे. परंतु नंतर पूर आला आणि सर्व लोक मरून गेले. मनुष्याचा पुत्र आल्यावर असेच होईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहवून नेईपर्यंत त्यांना समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपले काय होणार आहे हे त्यांना माहीत नव्हते, मग एकाएकी जलप्रलय आला आणि त्या सर्वांनाच जलसमाधी मिळाली. मानवपुत्र परत येईल त्यावेळीही अगदी असेच होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.