Matthew 26:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू म्हणाला, “ज्याला मी ओळखतो अशा त्या माणसाकडे खेड्यात जा आणि त्याला म्हणा, ‘गुरूजी म्हणतात: माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा करणार आहे.”‘
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, गुरुजी म्हणतात, “माझी वेळ येऊन ठेपली आहे. मी बारा जणांबरोबर तुमच्या येथे ओलांडण सण साजरा करीन.’”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी उत्तर दिले, “शहरात जा आणि या एका माणसाची भेट घ्या. त्याला सांगा की, ‘गुरुजी म्हणतात: माझी नेमलेली वेळ जवळ आली आहे. मी माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन तुझ्या घरी करेन.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू म्हणाला, “तुम्ही नगरात अमुक मनुष्याकडे जा आणि त्यास सांगा; ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण साजरा करणार आहे.”