Matthew 26:31 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशूने सांगितले, “आज रात्रीच तुमच्या मनात माझ्याविषयी शंकाकुशंका येतील आणि माझ्यावरील तुमचा विश्वास उडेल. पवित्र शास्त्रात असे लिहेले आहे: ‘मी मेंढपाळाचा वध करीन, कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’ ज्खऱ्याा 13:7
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्या रात्री मला सोडून पळून जाल कारण असे लिहिले आहे, “मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग येशू शिष्यांना म्हणाले, “आज रात्री तुम्ही सर्वजण मला एकट्याला सोडून पळून जाल, कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: “ ‘मी मेंढपाळावर प्रहार करेन, आणि कळपातील मेंढरांची पांगापांग होईल.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने सांगितले, “आज रात्री माझ्यामुळे, तुम्ही सर्व अडखळाल; कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळाचा वध करीन, कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’