Matthew 26:40 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्याला आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांना माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत, असे पाहून पेत्राला म्हणाला, “काय, घटकाभरही तुम्हांला माझ्याबरोबर जागे राहवले नाही काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, “हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण ते झोपी गेले आहेत असे त्यांना आढळले. पेत्राला त्यांनी म्हटले, “तुम्ही माणसे एक तासभरही माझ्याबरोबर जागे राहू शकला नाही का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्यास आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांस माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय?