Matthew 26:47 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक, लोकांचे वडीलजन यांनी त्यांना पाढविले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू बोलत आहे इतक्यात, बारांमधील एक जण म्हणजे यहुदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडचा एक जमाव तलवारी व सोटे घेऊन आला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो बोलत आहे इतक्यात, पाहा, बारा जणांतील एक जो यहूदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू बोलत आहेत तोच, त्यांच्या बारा पैकी एक, यहूदाह तिथे पोहोचला. त्याच्याबरोबर महायाजक आणि वडीलजनांनी पाठविलेला मोठा जमाव तरवारी आणि सोटे घेऊन आला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक लोक आणि वडीलजन यांनी त्यांना पाठवले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते.