Matthew 26:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू तेथे असताना एक बाई त्याच्याकडे आली. उंची अत्तराने भरलेली अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती. येशू जेवत असता ही कुपी त्या बाईने त्याच्या डोक्यावर ओतली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एक स्त्री फार मौल्यवान अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणीएक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे ते जेवायला बसले असताना, एक स्त्री अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ते बसले असताना येशूंच्या मस्तकावर तेल ओतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू तेथे असताना एक स्त्री त्याच्याकडे आली. अतिमौल्यवान सुवासिक तेलाची अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती आणि तो जेवणास टेकून बसला असता तिने ते त्याच्या डोक्यावर ओतले.