Matthew 27:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
न्यायासनावर बसला असता पिलात हे बोलला. तो तेथे बसलेला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला एक निरोप पाठविला. तो निरोप असा होता: “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्याविषयी स्वप्न पडल्यामुळे मला आज दिवसभर फार दु:ख सहन करावे लागेले आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला, “त्या निर्दोष मनुष्याच्या बाबतीत आपण मध्ये पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की, “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचवेळी, पिलात न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठविला, “त्या निर्दोष माणसाच्या विरुद्ध जाऊ नका, कारण आज स्वप्नात मी त्याच्यामुळे फार दुःख भोगले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्यास एक निरोप पाठवून कळवले, “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्यामुळे स्वप्नात मला आज दिवसभर फार दुःखसहन करावे लागले आहे.”