Matthew 27:34 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा त्यांनी येशूला पित्तमिश्रित द्राक्षारस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे त्यांनी येशूला विनेगर मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर त्याने तो घेतला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्याला ‘पित्तमिश्रित द्राक्षारस पिण्यास दिला,’ परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या ठिकाणी त्यांना पित्त मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्यांनी तो चाखून पाहिल्यावर घेतला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्यांनी त्यास पित्तमिश्रित द्राक्षरस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला.