Matthew 27:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो म्हणाला, “मी पाप केले आहे, मी एका निष्पाप मनुष्याला जिवे मारण्यासाठी तुमच्या हाती दिले.” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हांला त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“मी निरपराधी माणसाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी पाप केले आहे.” तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताचा विश्वासघात केला आहे.” “त्याचे आम्हाला काय? तू स्वतःच त्याला जबाबदार आहेस,” त्यांनी प्रत्युत्तर केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”