Matthew 27:48 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एक जण लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आला. त्या मनुष्याने तो बोळा आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून येशूला प्यायला दिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांच्यातून एकाने त्वरित धावत जाऊन स्पंज घेतला, तो आंबेत भिजवला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्यांच्यातून एकाने लगेचच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो ‘आंबेने’ भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लागलीच त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन शिरक्यात भिजविलेला एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्यातला एक लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून त्यास प्यायला दिला.