Matthew 28:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता ताबडतोब निघा आणि त्याच्या शिष्यांना सांगा : येशू मरणातून उठला आहे. तो गालीलात जाणार आहे. तो तुमच्या अगोदर तेथे जाईल, तुम्ही त्याला तेथे पाहाल.ʈ नंतर देवदूत म्हणाला, ʇमी तुम्हांला सर्व काही सांगितले आहे.ʈ
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, “तो मेलेल्यांतून उठला आहे, पाहा, तो तुमच्या आधी आता गालीलमध्ये जात आहे. तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल!’ पाहा, मी तुम्हांला सांगितले आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की, तो मेलेल्यांतून उठला आहे; पाहा, तो तुमच्याआधी गालीलात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल; पाहा, मी तुम्हांला हे सांगितले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता लवकर जा आणि त्यांच्या शिष्यांना सांगा: ‘येशू मेलेल्यामधून पुन्हा उठले आहेत आणि ते तुमच्यापुढे गालीलात जात आहेत. ते तिथे तुम्हाला भेटतील.’ जसे मी तुम्हाला सांगितले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, तो मरणातून उठला आहे आणि बघा, तो तुमच्यापुढे गालील प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पाहाल. पाहा, मी तुम्हास सांगितले आहे.”