Matthew 28:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून त्या स्त्रिया लगबगीने कबरेजवळून निघाल्या. त्या फार घाबरलेल्या होत्या. परंतु फार आनंदितही झाल्या होत्या. जे काही घडले ते सांगण्यासाठी त्या धावत निघाल्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा लगेच त्या स्त्रिया भीतीने परंतु अत्यंत आनंदाने कबरीजवळून निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगायला धावत जात असता
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भयभीत पण अतिशय आनंदित होऊन त्या स्त्रिया कबरेपासून दूर गेल्या, शिष्यांना देवदूताचा निरोप सांगण्यासाठी त्या धावतच निघाल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या.