Matthew 3:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योहानाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते. कातड्याचा कमरपट्टा त्याच्या कमरे भोवती होता. अन्न म्हणून योहान टोळ आणि रानमध खात असे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे. त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे आणि टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या योहानाचे वस्त्र उंटांच्या केसांचे होते, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योहानाचा पोशाख उंटाच्या केसांपासून तयार केलेला आणि त्याच्या कंबरेला चामड्याचा पट्टा बांधलेला होता. त्याचे भोजन टोळ आणि रानमध होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. त्याचा आहार टोळ व रानमध होता.