Matthew 3:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योहान जेथे लोकांना बाप्तिस्मा देत होता तेथे अनेक परूशी आणि सदूकी आले. जेव्हा योहानाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो, सापाच्या पिल्लांनो, देवाचा जो राग ओढवणार आहे त्याच्यापासून दूर पळण्याचे तुम्हांला कोणी सुचविले?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परुशी व सदूकी ह्यांच्यापैकी अनेकांना बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून दूर पळायला तुम्हांला कोणी सावध केले?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हांला कोणी सावध केले?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु पुष्कळ परूशी व सदूकी लोक त्यांच्याकडे बाप्तिस्मा घेण्याच्या विचाराने येऊ लागले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु परूशी व सदूकी यांच्यापैकी अनेक लोकांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, “अहो विषारी सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले?