Matthew 5:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु मी तुम्हांस सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु मी तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वासनेने पाहतो, त्याने त्याच्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलेलाच आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण मी तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेच्या दृष्टीने पाहतो, त्याने तिच्याबरोबर आपल्या अंतःकरणात आधीच व्यभिचार केला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे;