Matthew 6:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण जर तुमचे डोळे वाईट असतील, तर तुमचे सर्व शरीर पापाने अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा अंधकार वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार कितीतरी अंधकारमय असेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण तुझी दृष्टी सदोष असेल तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. तुझ्यातील प्रकाश जर अंधकारमय झाला तर तो अंधार किती भयंकर असेल!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल; ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तुमचे डोळे दोषपूर्ण असले, तर तुमचे संपूर्ण शरीर अंधाराने भरून जाईल. म्हणून तुमच्यातील प्रकाशच जर अंधार असला, तर तो अंधार केवढा मोठा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जर तुमचे डोळे सदोष असतील, तर तुमचे संपुर्ण शरीर अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा प्रकाश हा वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार किती असणार!