Matthew 8:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि जे त्याच्यामागुन चालत होते. त्यांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात इतका मोठा विश्वास असलेला एकही मनुष्य मला आढळला नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात कुठेही आढळला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलात आढळला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि समुदायाला म्हणाले, “मी तुम्हाला सत्य सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलातील कोणामध्येही आढळला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्यामागे येत असलेल्या लोकांस तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, मला इस्राएलात एवढा विश्वास आढळला नाही.