Matthew 8:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशूने उत्तर दिले, ‘तुम्ही विश्वासात किती उणे आहात रे? तुम्ही का घाबरता?’ मग त्याने उठून वारा व लाटा यांना अधिकारवाणीने शांत होण्यास सांगितले. वारा थांबला. समुद्र अगदी शांत झाला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही घाबरलात कशाला?” मग उठून त्याने वाऱ्याला व लाटांना दटावले. तेव्हा सारे निवांत झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरलात?” मग उठून त्याने वारे व समुद्र ह्यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू त्यांना म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?” मग ते उठले आणि त्यांनी वार्‍याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?” मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले.